Marathi Info

IVF

अनेक जोडपी बाळ होण्यासाठी IVF चा विचार करतात.मात्र IVF उपचार पद्धत घेत असतात त्या दोघांनांही अनेक शारीरिक व मानसिक समस्यांना तोंड द्यावे लागते.अशा वेळी IVF पहिल्याच सायकल मध्ये यशस्वी गर्भधारणा रहाणे हे सर्वस्वी तुमच्या शारिरीक क्षमता व मानसिक अवस्थेवर अवलंबून असते.

दिल्लीच्या Mother’s Lap IVF Centre मधील Medical Director and IVF Specialist डॉ.शोभा गुप्ता यांच्या मते जाणून घेऊयात IVF पद्धतीने यशस्वी गर्भधारणा राहण्यासाठी नेमके काय करावे.

१. प्रथम आय.व्ही.एफ ती पुर्वतयारी करा-

उपचार सुरु करताना कमीतकमी तीन महीने आधीपासून तुमच्या मासिक पाळीच्या तारखा व त्याबाबत इतर बाबी नोंद करुन ठेवा.कारण उपचार करताना याची मदत होऊ शकते.गर्भधारणा होण्याची शक्यता नेमकी कधी आहे किंवा गर्भधारणेत नेमकी काय अडचण आहे हे समजून घेण्यासाठी तुमच्या डॉक्टरांना यामुळे मदत होते.

२. ताण-तणाव टाळा-

जीवन जगत असताना सर्वच परिस्थितीत चिंता-काळजी पासून दूर राहणे अशक्य आहे.मात्र तुम्ही अशा वेळी जाणिवपूर्वक काही गोष्टी टाळू शकता ज्यामुळे तुम्हाला अधिक ताण येणार नाही.उपचार सुरु करण्यापुर्वी नवीन घरी शिफ्ट होणे,नवीन ठिकाणी जॉबला जाणे किंवा करीयर मध्ये बदल करणे टाळा.आय.व्ही.एफ उपचारांच्या चांगल्या परिणामांसाठी दोघांनीही जास्त ताण घेणे टाळा.कारण अती ताणाचा स्त्री व पुरुष दोघांच्यांही फर्टिलिटीवर विपरित परिणाम होऊ शकतो. जाणून घ्या गरोदरपणात आढळणारी ही ’20′ लक्षणं अगदी सामान्य आहेत

३. अ‍ॅक्युपंक्चर करा-

जर तुमच्या डॉक्टरांनी यासाठी तुम्हाला परवानगी दिली तरच तुम्ही एखाद्या विश्वनीय व सुपरिचित एक्युपंक्चर सेंटरमधून हे उपचार घ्या. एक्युपंक्चरचा महीलांना आयव्हीएफ उपचार घेताना गर्भधारणेसाठी अधिक चांगला फायदा होतो.काही महीलांना एम्ब्रीओज ट्रान्सफर केल्यानंतर एक दिवसाच्या आत जर एक्युपंक्चर उपचार दिले तर त्याचा त्यांना एम्ब्रीओज इम्प्लांटेशन व यशस्वी गर्भधारणा होण्यासाठी चांगला फायदा होतो.

४. सकस अन्न घ्या-

आय.व्ही.एफ उपचार यशस्वी होण्यासाठी व गर्भधारणा राहण्यासाठी तुमच्या आहारात चांगले बदल करा.अन्नातील पोषणमुल्यांमुळे स्त्रीच्या शरीरात सृदुढ एग्ज निर्माण होतात तसेच गर्भधारणेसाठी तिला याचा अधिक फायदा होतो.यासाठी संतुलित आहार घ्या.दिवसभरात चार ते सहा वेळा थोडे थोडे पोषक अन्न खा.तुमच्या रोजच्या आहारात ताज्या भाज्या व फळे तसेच ब्राऊन राईस सारखी कर्बोदके येतील याची दक्षता घ्या.ज्यामुळे तुमच्या शरीराला पुर्नउत्पादनासाठी व गर्भधारणेसाठी लागणारी पुरेशी उर्जा मिळेल. हे नक्की वाचा गर्भवती स्त्रियांच्या आहारात आवश्यक आहेत ही ‘१० सुपरफुड्स’

५. मुबलक पाणी प्या-

पुरेश्या प्रमाणात पाणी पिण्याने तुमच्या शरीरातील विषद्रव्ये (टॉक्सिन्स) शरीराबाहेर टाकण्यास मदत होते तसेच आय.व्ही.एफ उपचारातील इतर दुष्परिणाम होत नाहीत.ज्या स्त्रीयांना Ovarian hyper stimulation syndrome चा त्रास असतो त्यांना या उपचारात काही इंजेक्शन्स दिली जातात.मुबलक पाणी प्यायल्याने ही इंजेक्शन घेताना होणा-या वेदना व सुज कमी होते.या महीलांनी दिवसभरात कमीतकमी तीन ते पाच लीटर पाणी प्यावे. हे नक्की वाचा या ’8′ कारणांसाठी gynaecologist चा सल्ला अवश्य घ्या

६. अल्कोहोल घेणे टाळा-

अल्कोहोलचे सेवन गर्भधारणे पुर्वी किंवा गर्भधारणे नंतर करावे किंवा नाही हा मुद्दा वादाचा ठरु शकतो.पण असे असले तरी नियमित किंवा अगदी कमी प्रमाणातही मद्यपान केल्यास गर्भधारणा राहण्याचे प्रमाण ५० टक्क्यांनी कमी होऊ शकते. जाणून घ्या गर्भारपणात काय खाणे टाळाल?

७. कॅफेन चे अतीसेवन टाळा-

पाच किंवा त्यापेक्षा जास्त प्रमाणात कॉफी घेतल्यास मिसकॅरेज होण्याचा धोका अधिक असतो.अगदी त्याचप्रमाणे जर तुम्ही कोक,ज्युसेस,सॉफ्टड्रिंक घेतले तरी देखील त्यातील कॅफेनच्या प्रमाणामुळे गर्भधारणा होण्याची शक्यता कमी होते.

८. स्वत:ची काळजी घ्या-

ताणतणाव टाळण्यासाठी तुमच्या आवडत्या गोष्टी करा.पुस्तक वाचा,तुमच्या जोडीदाराशी गप्पा मारा,छंद जोपासा,बागेत फेरफटका मारा.आई होण्याच्या या भावनिक चढउतारामध्ये ताणापासून दूर राहण्यासाठी तुम्हाला आनंद मिळेल अश्या गोष्टी करण्याचा प्रयत्न करा. हे नक्की वाचा नैसर्गिक प्रसुतीसाठी 9 खास टिप्स

९. डॉक्टरांच्या सतत संपर्कात रहा-

कोणत्याही वेळी तुम्हाला त्रास अथवा अस्वस्थता जाणवल्यास त्वरीत तुमच्या डॉक्टरांना याबाबत सांगण्यास अजिबात संकोच बाळगू नका.तुमच्या मनातील भीती व काळजी बाबत देखील तुम्ही तुमच्या डॉक्टरांशी चर्चा करायला काहीच हरकत नाही.

१०. प्लॅन बी तयार  ठेवा-

नेहमी दुसरा पर्याय देखील तयार ठेवा.जर तुमचे हे आय.व्ही.एफ सायकल यशस्वी झाले नाही तरी धीर सोडू नका.तुम्ही तुमच्या आयव्हीएफ तज्ञांसोबत चर्चा करुन दुस-या आयव्हीएफ सायकल चा किंवा एग डोनर चा पर्याय निवडू शकता. जाणून घ्या IVF तंत्रज्ञानाच्या माध्यमातून 70रीच्या वयात दलजिंदर कौर यांनी कसा दिला बाळाला जन्म?

IUI IVF ICSI म्हणजे काय?

IUI  म्हणजे काय?

Intra uterine Insemination  यामध्ये गर्भ पिशवीच्या आतमध्ये पतीचे वीर्य Canulaने सोडले जाते. त्रीला पाळीच्या दुसर्या दिवसापासून गोळ्या अथवा इंजेक्शन देऊन अंडाशयात अंडी तयार करतात. त्याचे Follicular Study करून 36 तासानंतर IUI  केले जाते. पतीच्या शुक्रजंतूंची संख्या कमी असली तरी या पध्दतीमुळे फायदा होऊन गर्भधारणा होण्याची शक्यता वाढते

IVF / Test tube Baby म्हणजे काय?

IVF ( In Vitro Fertilization) (Test tube Baby) यामध्ये त्रीला पाळीच्या गोळ्या दिल्या जातात आणि पाळीच्या 20 व्या दिवसापासून इंजेक्शन सुरू होतात जी रोज 20-25 दिवस घ्यावी लागतात. मध्ये एक पाळी येते आणि दुसर्या दिवसापासून अंडाशयात अंडी तयार होण्यासाठी वेगळी इंजेक्शन सुरू करतात. पाळीच्या 9 व्या दिवसापासून Follicular Study करून अंडाशयातील Folliculesवाढ 18 मी. मी. पेक्षा जास्त झाली की इंजेक्शन देऊन 36 तासांनी तयार झालेली अंडी अंडाशयातून सुईने बाहेर काढतात. त्यासाठी सोनोग्राफीचा उपयोग केला जातो. पेशंटच्या पोटावर कोणतीही शत्रक्रिया केली जात नाही. बाहेर काढलेली अंडी आणि पतीचे शुक्रजंतू यांचे शरीराच्या बाहेर मीलन घडवून आणतात आणि शरीराबाहेर गर्भ तयार केला जातो. हा गर्भ Incubator मध्ये  2-3 दिवस वाढवून नंतर पत्नीच्या गर्भ पिशवीमध्ये सोडला जातो. हा गर्भ गर्भपिशवीत रूजतो. 9 महिने त्याची वाढ होते आणि नंतर बाळ जन्माला येते.

ICSI म्हणजे काय?

(ICSI  (Intra Cytoplasmic Sperm Injection)  ज्या पुरूषांमध्ये शुक्रजंतूंची संख्या अतिशय कमी आहे त्या जोडप्यासाठी या शात्राचा उपयोग होतो. या प्रकारात IVF सारखीच प्रक्रिया असते. फक्त शुक्रजंतू हे बीजांडावर न सोडता आतमध्ये इंजेक्शनने सोडतात. शुक्रजंतूंची संख्या चांगली असेल तर या प्रक्रियेची आवश्यकता नसते.

 Surrogate Mother  म्हणजे काय?

हा प्रकार हल्ली बर्याच टीव्ही सिरीयल मधून दाखवला जातो. एखाद्या स्त्रीला जन्मतःच गर्भपिशवी नसेल किंवा काही कारणांनी काढून टाकली असेल अथवा काही दोष असेल तर या मार्गाचा अवलंब केला जातो. पत्नीच्याच अंडाशयात अंडी तयार करून पतीचे शुक्रजंतू वापरून गर्भ तयार होतो तो दुसर्या त्रीच्या गर्भशयात वाढवला जातो. अशा प्रकारे पती आणि  पत्नीचे गुणसूत्र असलेला गर्भ हा दुसर्या आईच्या पोटात वाढवून पत्नीला बाळ दिले जाते. जी त्री हा गर्भ वाढवते तिला Surrogate Mother  म्हणतात. आई होण्यासाठी सल्ला म्हणजे त्यांनी फक्त शात्रीयदृष्टय़ा प्रयत्न चालू ठेवावेत.

PCOD चा इतिहास

सुरूवातीला स्टीन आणि ल्यूवेंथॉल या डॉक्टरांनी जेव्हा या आजाराने पिडीत स्त्रीया पाहिल्या तेव्हा त्यांना सोनोग्राफीत या स्त्रीयांच्या बीजांडात /ओव्हरीत कित्येक पाण्याने भरलेल्या गाठी (सीस्ट) दिसल्या. या सीस्टचे निर्मूलन करण्यासाठी बीजांडांचा थोडा भाग सर्जरीने काढून टाकल्यावर त्यातील कित्येक स्त्रीयांना गर्भधारणा होऊ लागली. त्यामुळे बीजांडात सीस्ट निर्माण झाल्याने होणारा रोग म्हणून या रोगाचे नांव पॉलिसिस्टिक ओवॅरियन डिसीज म्हणजे पीसीओडी ठेवण्यात आले. ज्या दोन डॉक्टरांनी हा आजार पहिल्यांदा शोधला त्यांच्या सन्मानाप्रीत्यर्थ या आजाराला स्टीन ल्यूवेंथाल डिसीज असेही म्हणतात. पण कालांतराने हा आजार केवळ बीजांडातील पाण्याच्या गाठी किंवा पॉलिसिस्टिक ओवरीज इतकाच मर्यादित नसून एकाच रोगाच्या विस्तृत पटलाचा हा केवळ एक भाग आहे हे लक्षात आले.

लक्षणे

या आजाराने पीडित महिलांमध्ये खालील लक्षणे दिसतात.

१.पाळीच्या सामान्य नियमित चक्रातील बदल

-बहुतेक मुलींना पहिली पाळी (मिनार्की) अगदी वेळेवर येते पण नियमित अश्या २-३ पाळ्या येऊन गेल्यावर पाळी बर्‍याच महिन्यांत येत नाही/ फार पुढे जाते.

-अनियमित/अनैसर्गिक पाळी – वारंवार किंवा फार कालावधीने पाळी येणे.रक्तस्त्राव अगदीच कमी किंवा खूपच जास्त होणे.

२.पुरुषीपणा(विरिलायजेशन)

-स्तनांचा आकार अचानक कमी होणे
-आवाज जास्तच घोगरा/पुरुषी होणे
-क्लायटोरिसचा आकार मोठा होणे
-छाती,पोट,चेहरा आणि स्तनाग्रंभोवती अतिरीक्त/पुरूषांसारखे केस वाढणे.
-टक्कल पडणे(मेल पॅटर्न बाल्डनेस)

३. त्वचेतील इतर फरक

-खूप जास्त प्रमाणात चेहरा/पाठ इथे मुरमे वाढणे.
-मानेचा मागचा भाग,बगला,मांड्यांमधला भाग इथे काळ्या रंगाच्या जाडसर वळकट्या(अकँथोसिस) पडणे.

४.चयापचयावर परिणाम (मेटॅबोलिक इफेक्ट) -इंस्युलिन्स रेजिस्टन्समुळे जाडी वाढणे आणि त्यामुळे मधुमेह,रक्तदाब इ.आजार.

इथे हे लक्षात घेणे जरूरीचे आहे की अगदी पूर्ण नॉर्मल मुलींनाही सुरूवातीच्या काही काळात पाळी अनियमित येऊ शकते. तसेच हा आजार कधीही उद्भवू शकतो,अगदी एक-दोन सामान्य बाळंतपणे होऊन गेल्यावर सुद्धा!

बर्‍याचदा स्त्रीया एक-दोन मुले असल्यास या आजाराचे उपचार घेण्यात टाळाटाळ करतात,पण असे करु नये कारण डायबेटिस / थायरॉईडसारखाच हा सुद्धा
जवळपास शरीरातल्या प्रत्येक भागावर परिणाम करणारा आजार आहे.

या आजाराचं नेमकं कारण

सिंड्रोम आणि रोग या वेगवेगळ्या गोष्टी आहेत. सिंड्रोम म्हणजे वेगवेगळ्या लक्षणांचा एक आजार समुह. या पीसीओएस मध्ये इतकी विविध लक्षणे आढळतात की २००३ पासून तज्ज्ञांनी खालीलपैकी २ लक्षणे आढळल्यास अशा आजारास पीसीओएस म्हणावे असे मान्य केले आहे.( European Society for Human Reproduction and Embryology (ESHRE) and the American Society for Reproductive Medicine (ASRM) )

१. अल्पबीजमुक्ती/अबीजमुक्ती (Oligo-ovulation or anovulation)- दोन पाळ्यांमधील काळ वाढणे किंवा अजिबात पाळी न येणे(oligomenorrhea or amenorrhea)

२.पुरूषी आंतर्स्त्राव वाढणे(Hyperandrogenism )- वर उल्लेखिल्याप्रमाणे पुरूषी बाह्यशरीरलक्षणे वाढणे किंवा पुरूषी स्त्रावांचे रक्तातील प्रमाण वाढणे.

३. सोनोग्राफीमध्ये बीजांडात द्रवपदार्थ भरलेले असंख्य कोष (सिस्ट) दिसणे-Polycystic ovaries

थोडक्यात पीसीओएस असण्यासाठी दरवेळेस सोनोग्राफीमध्ये असंख्य सीस्ट दिसतीलच असे नाही.

पीसीओएसची कारणे-

पीसीओएस या आजाराचं नेमकं कारण आजतागायत कळलेलं नाही. हा आजार वंशपरंपरागत असू शकतो पण असेलच असेही नाही. सध्या या आजाराच्या वाढत्या प्रमाणाचे एक मुख्य कारण आहार आणि जीवनशैलीतील बदल असावे हे सुचवले जाते.
मानवी शरीरात स्त्री आणि पुरूष या दोन्ही प्रकारचे आंतर्स्त्राव दोघांतही कमी अधिक प्रमाणात असतात. पण काही ठराविक गुणसूत्रांमुळे कोणते स्त्राव स्त्रीयांत आणि कोणते स्त्राव पुरूषांत जास्त प्रमाणात असावे हे ठरते.
तसेच शरीराच्या इतर पेशीत असणारे रीसेप्टर (जे ‘वरून-मुख्य न्यूरोहार्मोनल सिस्टीमकडून’ आलेल्या संदेशांचे ग्रहण करून त्याबरहुकूम कार्यवाही घडवून आणतात त्यांचे पेशीतील प्रमाण आणि संवेदनशीलताही स्त्री पुरुष शरीरात वेगवेगळी असते. ओव्हरी,टेस्टीज या खेरीज किडन्यांच्यावर असणारी छोटीशी सुप्रारिनल किंवा अ‍ॅड्रिनल ग्रंथीही पुरूषी प्रकाराची काही संप्रेरके बनवते.

सामान्यतः निसर्गाचे या सगळ्यांच्या समन्वयाचे एक चक्र असते पण काही जनुकीय घटकांमुळे किंवा चुकीच्या जीवनशैलीमुळे हे चक्र बदलले की त्याचे परिणाम असे पीसीओएसच्या स्वरूपात दिसून येतात.

(संप्रेरकांचे दळणवळण आणि कार्य हा फारच कीचकट आणि मनोरंजक विषय असला तरी एवढं तपशीलात जाणं इथे मला शक्य नाही. कुणाला अधिक कुतूहल असेल तर नेटवरून अधिक माहिती मिळवून वाचता येईल.)

उपचारांअभावी होणारे दुष्परिणाम

योग्य त्या उपचारांअभावी खालील दुष्परिणाम होऊ शकतात.

१.वंध्यत्व- अनियमित बीजमुक्तीमुळे गर्भधारणा होण्यात अडथळा येऊन वंध्यत्व.
२.गर्भाशयाच्या अंतर्पटलाच्या कर्करोगाची(एन्डोमेट्रिअल कॅन्सरची)शक्यता वाढते.
३.जाडी वाढल्याने अतिरक्तदाब, डायबेटिस आणि हृदयरोगांची शक्यता वाढते.
४.स्तनांच्या कर्करोगाची शक्यताही वाढते असे एका अभ्यासात दिसून आलेय.

Survey no. 110/2 A,

Plot.no.10/11, 100 Feet, Bypass road, Akluj, Tal: Malshiras Dist: Solapur 413101

94-224-62728

Call us today!

Opening Hours

11.00 A.M. to 4.00 P.M.

Appointment Booking

info@aklujivf.com